2024 E Book 2 प्रस्तावना २ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र – एक अभ्यास (भाग २ )

Rate this book:
2024

About This Book

<img src='https://i.postimg.cc/bsbGKb07/2024-1-E-Book-2.jpg' border='0' alt='2024-1-E-Book-2'/></a>

कल्पना करा – तुम्हाला एखाद्या मंदिरातील देवतेच्या समोर उभे राहिले असताना आदेश मिळाला की अमुक अमुक नावाच्या व्यक्तीला तू या या गावी जाऊन भेट. तर प्रथम जावे किंवा नाही असा संभ्रम निर्माण होईल.
कारण मंदिरात जाताना त्यानंतर काय करायचे हे साधारण ठरवून ठेवलेले असते. तरीही असे समजा की तो आदेश शब्दशः मानून तुम्ही त्या एका अज्ञाताच्या शोधात निघालात कि ज्याचे आपणास फक्त नाव व गावाचे नाव कळले आहे, तर मंदिराच्या बाहेर आल्यावरच्या पहिल्या चौकातून कुठे वळणार? डावीकडे ? उजवीकडे कि समोर ? वाट कोणाला विचारणार? कोणत्या भाषेत? अशा समस्या वाटूनही ‘सरळ वाट फुटेल तिकडे’ म्हणून आपण अशी यात्रा पायी करायचा निश्चय करून निघालात.
सध्या प्रमाणे बांधलेले रस्ते नाहीत, ढाबे, उपहारगृहे, राहायच्या सोई नाहीत, मार्गदर्शक पाट्या नाहीत…. तरी पण आपण ‘काही झाले तरी मी याचा शोध घेणारच’ या आपल्या निश्चयाच्या बळावर हा प्रवास चालू ठेवलात. त्यामुळे काही काही अंतरावर कोणीतरी आपणहून बोलावून किंवा हात दाखवून ज्या व्यक्तीला भेटायला निघाला आहेत त्यांचे नाव घेऊन, ‘जा, जरूर जा’ असे म्हणून खाण्यापिण्याची व्यवस्था करून पुढे पाठवतो.

Buy This Book

As an Amazon Associate and Bookshop.org affiliate, BookOrb earns from qualifying purchases.

Write a Review

Sign in to write a review.